मुंबई – आता स्वबळावर विधानसभेची निवडणुक भारतीय जनता पक्ष लढवणार आहे. भाजपने प्रचाराची जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार सभांचा धडाका लावला होता. विधानसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी जाहीर सभा घेवून आपल्या उवेदवारांचा प्रचार करणार आहेत.
भाजपने केली प्रचाराची जय्यत तयारी
सध्या नरेंद्र मोदी हे अमेरीकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोदींच्या सभांचा शुभारंभ होणार आहे. राज्यभरात नरेंद्र मोदी ४० सभा घेणार आहेत.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांच्यासह ५ राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचा प्रचार करणार आहेत. यांच्यासह भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यालाही भाजप प्रचारात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.