बायको द्या- मत घ्या

bahu
चंदिगढ – महाराष्ट्राबरोबरच हरियाना राज्यातही विधानसभा निवडणुकांची दंगल उसळली आहे. प्रचार जोमाने सुरू झाला आहे. उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी आपल्या मतदारसंघातून दारोदार फिरू लागले आहेत. या काळात मतदार राजा असतो, मागेल ते मिळते अशी संधी मतदाराला निवडणुकांतच मिळू शकते. हरियानातील जिंद जिल्ह्यातील मतदारांनी उमेदवारांकडे आगळीवेगळी मागणी केली आहे. त्यांनी नवरी द्या, मते घ्या अशी खुली ऑफरच उमेदवारांना दिली असून उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी चालणार आहे. जो उमेदवार या तरूण मतदारांना लग्नासाठी वधू आणून देईल त्यालाच मत देऊ असे या मतदारांचे म्हणणे आहे. आपल्या मागणीचे वजन वाढावे यासाठी या लग्नाळू वरांनी जिंद कुवाँरा युनियन स्थापन केली आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या या मागणीला खाप पंचायतीनेही पाठींबा दिला आहे.

या भागात पुरूष महिला रेशो १ हजार पुरूषांमागे ८२७ महिला असा आहे. त्यामुळे येथील उपवरांना वधू मिळणे अवघड झाले आहे आणि अनेक वर्षे वधूसाठी प्रतीक्षा करूनही लग्न जमत नाही अशी परिस्थीती आहे. विशेष म्हणजे गरीबश्रीमंत दोन्ही वर्गांना हा प्रश्न सतावतो आहे. कांही महिन्यांपूर्वी भाजपचे नेते धनवड यांनी हरियाणवी तरूणांना बिहारमधून वधू आणून देऊ असे विधान करून वाद निर्माण केला होता.

जिंद कुंवारा युनियनचे प्रदीप सिंह म्हणाले की येथे उपवर मुलीच नसल्याने तरूणांची लग्ने खोळंबली आहेत. कांही मॅरेज ब्युरो आहेत पण ते जबरदस्त फी आकारतात आणि तेथेही लग्नाच्या मुलींची संख्या अगदीच कमी आणि मुलाची संख्याच जास्त आहे.

Leave a Comment