कपिल देव यांना जीवनगौरव पुरस्काराने सम्मानित

kapil
लंडन – लंडन येथील हाऊस ऑफ लॉर्डस येथे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना क्रिकेटमध्ये केलेल्या भरीव योगदानाबद्दल व खुशी सोसायटीमध्ये गरजू व होतकरु लोकांना केलेल्या मदतीबद्दल त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार इंडो-युरोपियन फोरमच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे.

कपिलने हा पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंदी असल्याचे सांगितले. मला इंग्रजांचा खूप तिरस्कार होत असे. मात्र, त्यांच्याकडूनच क्रिकेटची देणगी भारताला मिळाली, याचा मला आनंद वाटतो, असे त्यांनी नमूद केले. कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ विकेट्रस घेतल्या असून त्यांचा हा विक्रम २००० सालापर्यत अबाधित होता. पण कर्टनी वॉल्शने हा विक्रम मोडीत काढला होता.

Leave a Comment