मायक्रोसॉफ्ट १० लाख भारतीय महिलांना करणार टेक सॅव्ही

microsoft
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक संख्येने महिला याव्यात, त्यांनी प्रशिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात नोकरी अथवा स्वतःचा उद्योग सुरू करावा यासाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने येत्या वर्षात १० लाख भारतीय महिलांना आयटीचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. बुधवारी या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे प्रमुख अधिकारी जोसेफ लँडस म्हणाले की सध्या या क्षेत्रात भारतात १० लाख महिला कार्यरत आहेत. येत्या वर्षात ही संख्या दुप्पट करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थिनी, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयात शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन युवती तसेच आय टी क्षेत्रातील प्रोफेशनल महिलांचा समावेश केला जात आहे. या निमित्ताने त्यांना आय टी क्षेत्रात नोकरी अथवा स्वतःचा उद्योग सुरू करण्यास मदत करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

कंपनीचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक म्हणाले, महिलांनी आयटी क्षेत्र करियर म्हणून निवडावे यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. त्यात साडेसात लाख मुली, युवती तसेच अडीच लाख आय टी प्रोफेशनल महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Leave a Comment