बाळाचे आईजवळ झोपणे धोकादायक

mother
न्यूयॉर्क – लहान बाळ एक वर्षाचे होईपर्यंत आई हेच त्याचे सर्वस्व असते. त्याची आई त्याला क्षणभर जरी दिसली नाही किंवा जाणवली नाही तर ते लगेच अस्वस्थ होते, इतके हे एकाच व्यक्तिमत्वाचे दोन पैलू असतात. त्यामुळे बाळाने आईच्या कुशीत झोपी जाणे हे बाळासाठी सुरक्षित मानले जाते. या गोष्टीला आजपर्यंत एकमुखी मान्यता होती. परंतु आता मात्र काही संशोधकांनी या गोष्टीला आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे.

बाळ आईजवळ झोपल्याने त्याला आईपासून एखाद्या विकाराचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आईच्या कुशीत बाळ सुरक्षित नसून ती बाळासाठी एक जोखीम आहे असे अमेरिकेतल्या काही संशोधकांनी म्हटले आहे. आजवर आपण सर्वजण असे मानत आलो की, आई कशीही असली तरी बाळासाठी धोकादायक ठरू शकत नाही. आईचे दूध बाळासाठी सर्वस्व असते, ती आजारी असले तरी तिने स्तनपान करावे त्यामुळे बाळाला काहीही धोका होत नाही असे मानले गेले असले तरी ते सर्वस्वी बरोबर नाही.

अमेरिकेतील लहान मुलांच्या मरणाची कारणे शोधली असता आईच्या कुशीत झोपणे हे लहान मुलांच्या मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी तिसर्‍या क्रमांकाचे स्थान आहे असे आढळून आले. जॉर्जिया प्रांतातील युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया या विद्यापीठातील संशोधक ट्रायना साम वार्ड हिने हे संशोधन केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment