अल्जिरियात फ्रान्स नागरिकाचा शिरच्छेद

harve
अल्जिरिया – इराक आणि सिरीयात इस्लामिक स्टेट दहतशवाद्यांच्या ठिकाणांवर अमेरिका व अन्य विदेशी देशांकडून केल्या जात असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि इस्लामिक स्टेटला पाठींबा दर्शविण्यासाठी अल्जिरियातील दहशतवादी गट जुंद अल खिलाफत ने हर्वी गॉर्डेल या फ्रान्सच्या नागरिकाचा शिरच्छेद करून त्याचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. रविवारी या संघटनेने त्याला ताब्यात घेतले होते. तो अल्जिरियात फिरण्यासाठी आला होता. हर्वीच्या शिरच्छेदाच्या वृत्ताला फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांनी दुजोरा दिला आहे.

इराकमध्ये फ्रान्सनेही इस्लामिक स्टेट च्या कब्जातील भागात आणि त्यांच्या अड्डयांवर विमान हल्ले सुरू केले आहेत. त्याचा निषेध म्हणून हे कृत्य करण्यात आले. जारी केलेल्या व्हिडीओत ५५ वर्षीय हर्वीला गुडघ्यावर बसविले गेल्याचे दाखविले असून त्याच्या मागे मास्क घातलेले चार दहशतवादी आहेत. ते अरबी भाषेत बोलत होते. प्रत्यक्ष शिरच्छेदाचे दृष्य व्हिडीओत नसले तरी या दहशतवाद्यांपैकी एकाच्या हातात हर्वीचे कलम केलेले शिर दाखविले गेले आहे.

Leave a Comment