आता चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे – माणिकराव ठाकरे

manikrao
मुंबई :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आता आघाडीची चर्चा करण्याची वेळ निघून गेली, असे स्पष्ट मत व्यक्त केले असून राष्ट्रवादीचा कोणताही प्रतिसाद न आल्याने आम्ही पहिली यादी जाहीर केल्याचेही माणिकराव ठाकरे म्हणाले. माणिकराव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे आघाडी तुटली हे जवळपास निश्चित झाले आहे.

काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत राष्ट्रवादीला हव्या असलेल्या जागांवरही उमेदवार जाहीर करुन सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिल्यामुळे राष्ट्रवादी सैरभैर झाली आहे. त्यांची येणारी दुसरी यादीही अजून तरी जाहीर झालेली नसल्यामुळे महाराष्ट्राला चौरंगी किंवा पंचरंगी निवडणुका पाहायला मिळणार की काय ? अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे.

विधानसभेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी दोन दिवस उरले असून तरीही राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही.

Leave a Comment