लादेनच्या जावयाला आजन्म कारावासाची शिक्षा

laden
न्यूयॉर्क – अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा जावई सुलेमान अबु घयात याला अमेरिकेवर ११ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्यात दोषी धरून मॅनहटन न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या हल्ल्यातील आरोपीला अमेरिकेत शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुलेमानला गेल्या फेब्रुवारीतच दोषी ठरविले होते. त्याच्यावर हल्ल्याचा कट रचणे व दहशतवाद्यांना त्यासाठीची शस्त्रसामग्री पुरविण्याचे आरोप ठेवले गेले होते. तीन आठवड्यांच्या ज्युरी ट्रायलनंतर त्याला शिक्षा सुनावली गेली आहे.

४८ वर्षीय सुलेमान अल कायदाचा माजी प्रवक्ता आहे. त्याला २००२ मध्ये अफगाणिस्तानातून इराकमध्ये ओसामाने आणले होते. व अल कायदाच्या अन्य नेत्यांबरोबरच तो पकडला गेला होता. अमेरिकेवरील हल्ल्यानंतरही त्याने अल कायदा सदस्यांना अमेरिकेन नागरिकांना ठार करण्याची शपथ दिल्याची कागदपत्रे तपास अधिकार्‍यांच्या हाती लागली आहेत. हल्ल्यानंतर ओसामा, जवाहिरी व अन्य अल कायदा नेत्यांसह त्याने भाषण दिले होते तसेच अमेरिकेलाही तुमच्याविरोधात लढण्यासाठी मोठे सैन्य येत आहे, तुमच्यावर घोंघावत असलेले विमान वादळ कधीच शांत होणार नाही असा इशारा दिला होता.

अमेरिकन, ख्रिश्चन आणि ज्यू नागरिकांना ठार करणे हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे सांगून सुलेमानने मुस्लीम नागरिक, लहान मुले आणि अमेरिकाविरोधी नागरिकांनी विमान प्रवास टाळावेत असे आवाहन केले होते. तो अत्यंत स्फोटक भाषणे करत असे.

Leave a Comment