बनाव आहे अर्जुन पुरस्कार : मिल्खा सिंग

milkha-singh
दिल्ली : अर्जुन पुरस्काराबाबत भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांनी पुरस्कारांच्या इतिहासात १०० पेक्षा अधिक पुरस्कार हे बोगस असल्याचा आरोप केला आहे. २००१ साली सिंग यांनी अर्जुन पुरस्कार घेण्यास नकार दिला होता.

सिंग पुढे म्हणाले की, आम्ही पुरस्काराची कोणतीही अपेक्षा न करता प्रदर्शन चांगले करण्यावर भर देत होतो. पण सध्या परिस्थितीत बद्दल झाला आहे. आताचे खेळाडू हे अर्जुन पुरस्कार मिळविण्याच्या हव्यासापोटी खेळतात. ज्यावेळी मला सुवर्णपदक मिळले होते त्यावेळी मी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे ‘पंजाबमध्ये मोठी जमीन किंवा दिल्लीत बंगला देण्याची मागणी केली असती’, तर ती सहज पूर्ण झाली असती. पण मी देशाचा विचार केला, याची आठवण सिंग यांनी सांगितली.

Leave a Comment