गुंड शरद मोहोळ पुण्यातून लढविणार निवडणूक

mohol
पुणे – येरवडा कारागृहात इंडियन मुजाहिद्दीनच्या सिद्दीकीची हत्या करण्याच्या गुन्हयावरून शिक्षा भोगत असलेला गुंड शरद मोहोळ यंदाची विधानसभा निवडणूक कोथरूड किंवा शिवाजीनगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढविणार आहे. मोहोळ सध्या तळोजा तुरूंगात आहे व तेथूनच निवडणुकीची सर्व सूत्रे तो हलवित असल्याचे समजते.

कांही महिन्यांपूर्वी मुठा उपसरपंचपदाची निवडणूक लढविण्याचाही त्याने प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी ते शक्य झाले नाही. अर्थात तेव्हाच शरद मोहोळ राजकारणात उतरत असल्याचे संकेत दिले गेले होते. लवासातील दानवे गावाच्या सरपंचाचे अपहरण करून त्याने ४६ लाखांची खंडणी उकळली होती. त्याच्यावर हत्या, अपहरण, खंडणी, लूट, दरोडे असे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. सरपंच खंडणीप्रकरणात येरवडा जेलमध्ये असतानाच त्याने त्याचा साथीदार भालेराव याच्यासह सिद्दीकीची हत्या केली होती व त्यामुळे सर्व पुण्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्याला तळोजा तुरूंगात हलविले गेले आहे.

Leave a Comment