अलिबाबाचा जॅक मा चीनमधील सर्वाधिक श्रीमंत

alibaba2
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये जगातला सर्वाधिक मोठा आयपीओ ठरून लिस्ट झालेल्या अलिबाबा या ई कॉमर्स कंपनीचा संस्थापक जॅक मा चीनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनला आहे ५० वर्षीय मा ला हुसेन वेल्थ बायबल मध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थान दिले गेले असून त्याची संपत्ती २४.४ अब्ज डॉलर्स म्हणजे १५० अब्ज युआन इतकी नोंदविली गेली आहे. या यादीत प्रथम स्थानी गतवर्षी दलियान वांडा ग्रुप या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनीने वांग जिगलिन हे होते ते यंदा दुसर्‍या स्थानावर गेले आहेत. जिगलिन यांची संपत्ती आहे १४५ अब्ज युआन.

१५ वर्षांपूर्वी जॅक मा ने अलिबाबा सुरू केली तेव्हा ती सुरू करण्यासाठी त्याला मित्रांकडून ६० हजार डॉलर्स उसने घ्यावे लागले होते कारण त्याच्या कंपनीसाठी कोणत्याही बँकेने कर्ज देण्याची तयारी दाखविली नव्हती. आज हीच कंपनी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मा ने २०० अब्ज डॉलर्स मालमत्ता असलेली कंपनी म्हणून पुढे आणली आहे. मा चे वडील केवळ ४० डॉलर्स महिना इतक्या पेन्शनमध्ये कुटुंब चालवित होते आज ते देशातील सर्वात श्रींमत व्यक्तीचे वडील बनले आहेत.

Leave a Comment