राष्ट्रवादीने कळवली वाढीव १४ मतदारसंघाची नावे !

aagahdi
मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडी न होण्यासाठी काँग्रेसने चर्चेसाठी आणखी एक हात पुढे केला असून राष्ट्रवादीला १२८ जागा देऊ केल्या आहेत. राष्ट्रवादीला २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११४ जागा दिल्या होत्या. आता त्यात १४ जागा अधिकच्या देऊ केल्या आहेत. काँग्रेसने या जागा वाढवून देताना १४ ही मतदारसंघाची नावे राष्ट्रवादीला कळवली आहेत. दरम्यान, यातील १२ जागा अपक्ष व राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीला हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता कमी आहे.

दुसरीकडे, आज सकाळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक सुरू असून या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अंतिम व आघाडी तोडण्याचा अथवा करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. आज सायंकाळपर्यंत याबाबत काहीतरी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

Leave a Comment