
मुंबई – विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंगळवारी दोन विद्यमान आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश असून पंढरपूरचे स्वाभिमानी पक्षाचे विद्यमान आमदार भारत भालके आणि चांदवडचे अपक्ष आमदार शिरीष कोतवाल यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये दोन विद्यमान आमदारांच आगमन
गेल्या निवडणुकीत त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा ज्यांनी पराभवाची धूळ चारली तेच आहेत हे भारत भालके. तर शिरीष कोतवाल हे आतापर्यंत दोन वेळा चांदवडचे आमदार राहिले आहेत. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा विजय झाला होता. तर २००९ मध्येही पुन्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.
काही दिवसांपूर्वीच आमदार शिरीष चौधरी, वसंत चव्हाण, जयकुमार गोरे आणि सुरेश जेथलीया या चार अपक्ष आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
