सॅमसंग नोट ४ दिवाळीपूर्वी तर टायझेन ओएस दिवाळीनंतर येणार

note4
सॅमसंगने त्यांचा गॅलेक्सी नोट चार दिवाळीपूर्वीत भारतात सादर होत असल्याची घोषणा केली आहे. यात स्क्रीनसाठी अनेक नवीन फिचर्स दिले गेले आहेत.५.७ इंचाचा सुपर अमोलेड स्क्रीन युजर गरजेनुसार छोटा अथवा मोठा करू शकणार आहे. तसेच एकच स्क्रीनवर अनेक विडोज पाहता येणार आहेत. तसेच या नोटसाठी दिलेले एस पेन अधिक बारीक आहे आणि त्याचा माऊस प्रमाणेही वापर करता येणार आहे. प्रथम हा नोट दिवाळीनंतर भारतात लाँच केला जाणार होता असेही समजते. गॅलेक्सी नोट यूएस, युके नंतर आक्टोबरमध्ये भारतात दाखल होईल.

सॅमसंग ने त्यांची टायझेन ही स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम दिवाळीनंतर लाँच करण्याचा निर्णय घेतला असून या सिस्टीमसह येणारा स्मार्टफोन सॅमसंग झेड नावाने आणला जाणार असल्याचे वृत्त आहे. भारतात तो कोणत्या नावाने येणार हे कळले नसले तरी तो नोव्हेंबरमध्ये सादर होईल असेही सांगितले जात आहे. या नव्या ऑपरेटिंग सिस्टीममुळे सॅमसंगला गुगल अँड्राईडवर अवलंबून राहण्यची गरज उरणार नाही. कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी इनहाऊस ऑपरेटिंग सिस्टीम प्रोजेक्टवर गेली दोन वर्षे काम केले जात होते

Leave a Comment