
मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून सुरु असलेल्या कलगीतुऱ्याला महायुतीचे घटक पक्ष चांगलेच वैतागले असून सेना-भाजपची आमच्या १८जागांनी भूक भागणार असल्यास त्याही घ्या, अशी संतापजनक प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे.
राजू शेट्टींची सटकली! म्हणाले आमच्या जागांनी तरी तुमची भूक भागेल का?
तसेच शिवसेना-भाजप युती न झाल्यास ४ मित्रपक्षांची मोट बांधणार असल्याचेही यावेळी राजू शेट्टींनी नमूद केले आहे.
दरम्यान रासपने सेना-भाजपला समेट घडवण्यासाठी आजचे अल्टिमेटम दिले आहे. तसेच भाजप आणि सेना घटकपक्षांना सन्माजनक जागा देत नसतील तर स्वाभिमानी आणि रासप युती करून स्वतंत्र लढेल असा इशारा, महादेव जानकर यांनी दिल्यामुळे शिवसेना आणि भाजपचे आव्हान आणखीनच वाढले आहे.
