जिवीने आणला सर्वात स्वस्त स्मार्टफोन

jivi
नवी दिल्ली – जिवी मोबाइल कंपनीने भारतात आज पर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला असून ‘जिवी जेएसपी २०’ ह्या फोनची किंमत आहे फक्त १ हजार ९९९ रुपये.

या फोनचे दिल्लीत लाँचींग झाले. २७ सप्टेंबरपासून या फोन बाजारात उपलब्ध होणार आहे. मात्र, या फोनचं ऑनलाइन बुकिंग सुरु झाले आहे. २५ सप्टेंबरपासून याची डिलीव्हरी सुरु होणार आहे.

३.५ इंची डिस्प्ले असलेल्या फोनच्या सेग्मेंटमध्ये हा फोन सर्वात स्लिम असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात वॉट्स अॅप, फेसबुक, युट्यूब सारखे सर्व फिचर्स मिळणार आहेत.

Leave a Comment