लैंगिक अपराध्यांचा स्वर्ग आहे मिरेकल गांव

mirekal
वाचून नवल वाटले ना? पण हे सत्य आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील हे छोटेस गांव लैंगिक अपराधाबद्दल शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगारांचा स्वर्ग आहे. कांही काळापूर्वी हे गांव ऊसशेतीसाठी प्रसिद्ध होते मात्र नंतर ते ओसाड पडले होते. त्या गावातील स्थानिक पाद्री डिक विथ्रो याच्या प्रयत्त्नातून २००९ सालापासून येथे अशा गुन्हेगारांना निवारा मिळाला आहे.

अमेरिकेत लैंगिक अपराधासंबंधाचे कायदे अतिशय कडक आहेत. तेथे प्रत्येक राज्याचे कायदे वेगळे आहेत व त्यातही फ्लोरिडात हे कायदे जादाच कडक आहेत. अशा अपराधाबद्दल शिक्षा भोगून आलेल्यांना राहण्यासाठी येथे सहजी जागा मिळत नाहीच पण त्यांना कुठेही जायचे यायचे असले तरी पब्लीक ऑफिसरला कळविल्याशिवाय जाता येत नाही. रात्री १० ते सकाळी ६ ते बाहेर पडू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर शाळा, डे केअर, पार्क, मैदान अशा ठिकाणांपासून त्यांना १ हजार मीटर दूर राहणे बंधनकारक आहे. कांही जणांना अँकल जीपीएस ब्रेसलेट घालावे लागते त्यामुळे त्यांच्यावर सतत नजर ठेवणे शक्य होते.

या सार्‍याचा विचार करून पाद्री डिक याने मिरेकल या ओसाड गावात त्यांची वस्ती बनविली आहे. अर्थात त्यासाठी त्याला खूप प्रयास करावे लागले आहेत. या गावात सध्या १५० असे रजिस्टर्ड रहिवासी आहेत आणि दर आठवड्याला ही संख्या वाढत जाते आहे. या गावात लहान मुलासह राहता येत नाही. शिवाय रागावर नियंत्रण, बायबल वाचन, मानसिक उपचार यांचे क्लासेस सातत्याने अटेंड करावे लागतात. येथील रहिवाशांना नियमित चर्चला जावे लागते आणि त्यातील कांही जण गावातच नोकरीही करू शकतात.

Leave a Comment