पनीर मांच्युरियन – रविवार स्पेशल डिश

paneer
साहित्य – २०० ग्रॅम पनीर, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी मैदा, ३ अंड्यातील पांढरा बलक, पाव चमचा अजिनोमोटो, ५-६ लसूण पाकळ्या, चार चमचे आले लसूण पेस्ट, ३ टी स्पून सोयासॉस, कोथिंबीर, अधी वाटी चिरलेली कांदा पात, तेल, मीठ
कृती – पनीरचे चौकोनी अथवा त्रिकोणी तुकडे करून घ्यावेत. त्याला थोडे मीठ आणि दोन चमचे आलेलसूण पेस्ट लावून १० मिनिटे ठेवावेत. एका भांड्यात कॉर्नफ्लॉवर, अंड्याचा पांढरा बलक, मैदा, आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालावे आणि हे मिश्रण आवश्यतेनुसार पाणी घालून सैलसर भिजवावे. नंतर या मिश्रणात पनीरचे तुकडे बुडवून तेलात तळावेत.

दुसर्‍या भांड्यात थोडे तेल गरम करून त्यावर बारीक चिरलेली लसूण परतावी. थोडी कोथिबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोयासॉय, थोडी कांदापात घालावी. त्यावर तळलेले पनीरचे तुकडे घालावेत व दोन वाट्या पाणी घालून मंद आचेवर उकळावे. अर्धी वाटी पाण्यात थोडा मैदा कालवावा आणि तो उकळत्या मिश्रणात घालावा. दाट होत आले की चवीनुसार मीठ, अजिनोमोटो व कोथिबीर घालून चांगले हलवावे आणि गरम गरम भाताबरोबर वाढावे. हे चार माणसांसाठी पुरेसे होते.

Leave a Comment