चीनमध्ये लाच देणा-या कंपनीला २,७०० कोटींचा दंड

gsk
बीजिंग – ब्रिटिश कंपनी ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके)ने चीनमध्ये औषधांची विक्री वाढवण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडला असून चीनमधील कोर्टाने कंपनीला २ हजार ७ ९४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हा देशातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील सर्वात मोठा दंड मानला जातो. जीएसकेने औषधांची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना लाच किंवा प्रलोभने देण्याचा फंडा सुरू केला होता. चांगसा पीपल्स कोर्टमध्ये बंद दरवाजा आड झालेल्या सुनावणीत हा निवाडा दिला. कंपनीचा चीनमध्ये कारभार पाहणा-या ब्रिटिश व्यवस्थापकास तीन वर्षांची कैद झाली आहे. त्याचबरोबर त्यांची चीनमधून हकालपट्टी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. लाच देऊन विक्री वाढवण्याचे काम करण्यासाठी कंपनीने पाच अधिका-यांची नियुक्ती केली होती. या अधिका-यांना दोन ते तीन वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे सर्व चिनी नागरिक आहेत. दरम्यान, जीएसकेने कंपनीच्या माफीनामा जारी केला.

Leave a Comment