सिंचन घोटाळा प्रकरण; अजित पवार आणि सुनिल तटकरेंच्या अडचणीत वाढ

ajit-pawar
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मानगुटीवर ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घोटाळ्याचे भुत बसणार असून न्यायालयाने सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या चौकशीची मागणी मान्य केल्यामुळे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गृहमंत्रालयाकडे सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

गृहमंत्रालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशीची मागणी मान्य केली असून मुख्यमंत्र्यांकडे मुख्य सचिव ही फाईल पाठवणार असून, याबाबतचे अंतिम निर्णय मुख्यमंत्र्याकडेच राहणार असल्याचे समजते.

सामाजिक कार्यकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे राज्यातील सिंचन प्रकल्पांत घोटाळा झाल्याची तक्रार केली होती. राज्यातील बारा सिंचन प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

Leave a Comment