सायना, सिंधूची आशियाई क्रीडा स्पर्धेत विजयी सलामी

saina-nehwal
इंचेऑन – भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू या दोघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत विजयी सलामी दिली असून त्यांनी मकाऊचा ३-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

लेंग वाँग हिचा सायना नेहवालने २१-६ आणि २१-४ या सरळ सेटमध्ये पराभव केला तर दुसरीकडे पी.व्ही. सिंधूने तेंग लोकचा २१-८ आणि २१-९ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

तर दुहेरीत एन. सिक्की रेड्डी आणि प्रज्ञा गद्रे या जोडीने झिबो झँग आणि रोंग वँग जोडीचा २१-१६ आणि २१-१७ या सेटमध्ये पराभव केला.

आशियाई स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या नेमबाजांनी धडाकेबाज कामगिरी करत भारताच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक कांस्य पदकांची कमाई केली आहे.

Leave a Comment