लोकशाही आघाडीने लावला पहिला नंबर; पहिली यादी जाहीर

prakash-ambedkar
मुंबई – प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्र लोकशाही आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून २८८ जागा लोकशाही आघाडी लढवणार आहे.

आज लोकशाही आघाडीने ४२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

दरम्यान, शिवसेना-भाजप पितृपक्ष अपवित्र मानत असल्यामुळे निर्णय घेत नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याचबरोबर डाव्या आघाडीला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईमधील एसआरए स्कीम रद्द करून स्वस्त घरं देणार, स्वस्त दरात औषधं मिळावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Leave a Comment