आयफोन ६ खरेदीचा पहिला मान अमेरिकन डेव कडे

iphone
आयफोन ६ ची क्रेझ किती प्रमाणात आहे याचे पुरावे आता जगभरात जागोजागी मिळू लागले आहेत. आयफोन ६ चा प्रथम ग्राहक बनण्याचा मान अमेरिकन नागरिक डेव रेहमी याला मिळाला आहे. तो हा फोन घेण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करून सिडनी येथे आपल्या मैत्रिणीसह गेला आणि त्याने फोन ताब्यात घेतला. त्याने कॅलिफोनिर्यातून हा फोन बुक केला होता. डेव्ह आणि त्याची मैत्रिण जास्मीन फोन खरेदीसाठी वेगवेगळ्या लाईनीत उभे राहिले होते असे समजते.

ऑस्टेलियातील नाईन न्यूजने दिलेल्या बातमीनुसार पर्थ येथे अॅपल स्टोरमधून आयफोन ६ घेणारा पहिला ग्राहक जॅक ठरला. मात्र आनंदाच्या भरात त्याच्या हातून फोन खाली पडला. पण फोनला कांहीही न झाल्याने त्याच्या आनंदात अधिक भर पडली. जगभरातच विविध अॅपल स्टोरसमोर ग्राहकांच्या आयफोन ६ खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. लोक तंबू, खुर्च्या टाकून दुकाने उघडण्याची वाट पहात होते असेही समजते. टोकियोमध्ये तर इतकी मोठी लाईन होती की शेवटी दुकानदाराने ग्राहकांना फार प्रतीक्षा करावी लागते आहे हे पाहून त्यांना कॉफी पाजली. आपल्या कडे शाळा प्रवेशासाठीचे अर्ज घेण्यासाठी जशा पालकांच्या रांगा लागतात तशाच रांगा आयफोन सहा खरेदीसाठी लागल्या असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment