अनिसचे राजकीय पक्षांना आवाहन; पितृपंधरवडय़ात अर्ज दाखल करा

mukta
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपले अर्ज पितृपंधरवडय़ात राजकीय नेत्यांनी हिंमत दाखवून दाखल करावेत, असे आवाहन शनिवारी केले.

विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिसच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तेरा महिने पूर्ण होऊनही तपास पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या. अंनिसचे मिलिंद देशमुख, श्रीपाद ललवाणी, माधव गांधी, टी.एस. बोरावी आणि अन्य कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

उमेदवार आपला अर्ज पितृपंधरवडय़ामध्ये दाखल करत नाहीत, असा प्रश्न विचारला असता, मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, पितृपंधरवडय़ात विधानसभा निवडणुकसाठी अर्ज भरून आपण जनतेसाठी काम करतो, हे राजकारण्यांनी दाखवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचे धाडस त्यांनी दाखविले पाहिजे. पितृपंधरवडय़ात आपल्या पितरांचे आत्मे आपल्या घरी येतात, त्यांना आपण नैवैद्य दाखवून संतुष्ट करायचे असते, असे असताना पितृपंधरवडा आपण अशुभ का मानतो, हे कळत नाही. या गोष्टी मानसिकतेतून घडत असतात. आत्मा आणि पुनर्जन्म या संकल्पना अजून वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment