दिल्ली – मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्याना आता चांगलाच फटका बसणार आहे कारण एअरटेल आणि वोडाफोन या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी २ जी डेटाची किंमत जवळजवळ दुप्पट केली असून पूर्वी १५५ रूपयात १ जीबी डेटा महिन्याभरासाठी मिळत होता आता तोच डेटा ५१२ एमबी इतका करण्यात आला आहे.
महाग झाले मोबाईलवरील इंटरनेट
याअगोदर काही भागांमध्ये या किंमती वाढविण्यात आल्या होत्या. पण आता ही किंमत सर्वत्र लागू करण्यात आली असून या वर्षात या कंपन्यांनी दुस-यांदा डेटावरील किंमत वाढविली आहे. वोडाफोनने देखील डेटावरील किंमती वाढविल्या आहेत. कंपन्या आता ग्राहकांना ३ जी डेटा वापरण्यासाठी प्रेरित करत आहेत.