स्कॉटलंडवासियांचा ब्रिटनमध्येच रहाण्याचा निर्णय

scotland
इडेनबर्ग – स्कॉटलंडच्या नागरिकांनी ऐतिहासिक ‘जनमत संग्रह’मध्ये आपले मत नोंदवत स्कॉटलंड युनायटेड किंगडमपासून विभक्त होणार नाही, असा निर्णय दिला आहे. स्कॉटलंडच्या जनतेने स्वातंत्र्य धुडकावून लावले आहे.

जनमताच्या निर्णयानुसार, ५५.४२% टक्के जनतेने ‘नाही’ तर ४४.५८% टक्के जनतेने ‘होय’ हा पर्याय निवडला आहे. ब्रिटनपासून स्कॉटलंडने वेगळे व्हावे किंवा नाही, असे पर्याय त्यांच्यासमोर होते. आत्तापर्यंत ३१ पैंकी ३२ राज्यांचा निकाल हाती आला आहे.

३०७ वर्षांपूर्वी १७०७ साली स्कॉटलंडचा ब्रिटनमध्ये समावेश केला आहे. वर्षोनुवर्ष राजघराण्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ब्रिटनमधून स्कॉटलंडला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्यावा की नाही यासाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले.

Leave a Comment