… तर स्वाभिमानी संघटना स्वतंत्र लढणार

raju-shetty
पुणे: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे महायुतीत सहभागी असलेल्या इतर पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप शिवसेनेतील वाद मिटण्याची दि. २१ पर्यंत वाट बघेल; अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू; असा इशाराच खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

आम्ही जागेसाठी अडून बसलेलो नाही. स्वाभिमानी संघटना जास्त जागा मागते; असा प्रचार हेतुपुरस्सर केला जात आहे. मात्र त्यात तथ्य नाही. आता खरेच कोण जास्त जागा मागते; ते स्पष्ट झाले आहे; असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. पाहिजे तर आमच्या वाट्याच्या जागाही तुम्ही घ्या; पण भांडणे मितवा; असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

राज्यात ६३ जागा लढण्याची ‘स्वाभिमानी’ची तयारी असून त्यासाठीची चाचपणी पूर्ण झाली आहे. दि. २१ रोजी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. तोपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटला तर ठीक. अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू; असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

Leave a Comment