मतदार यादीत एकाच मतदाराचे चक्क तीनवेळा नाव

voter-list
बीड – सध्या मतदार याद्यांची छाननी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सुरु असून बीडमध्ये एका व्यक्तीचे नाव मतदार यादीत तीनवेळा आढळून आले आहे.

हा प्रकार उघड झाल्यानंतर, जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बीड जिल्ह्यात १२ हजार मतदारांची नावे मतदारयादीत दोन वेळा आली आहेत.

विनायक मेटे यांनी हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर, बीड जिल्ह्यातील आनंद गाव सरणी इथे ७८ हजार बोगस मतदार सापडले आहेत.

Leave a Comment