विधानसभेआधीच दोन जिल्ह्यातून लाखोंची रोकड जप्त

currancy
बुलडाणा – मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये ६६ लाख ४३ हजार रुपयांची संशयास्पद रोकड पोलिसांनी जप्त केल्यामुळे राज्यात या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मलकापूर पोलिसांनी रात्रीच्या वेळी ६६ लाखाची रोकड घेऊन जात असलेल्या अॅल्टो कारसहित ३ जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र ही रक्कम कोणाच्या मालकीची आहे, हे अद्यापही निष्पन्न झालेले नसल्यामुळे निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या रकमेविषयी अनेक शंका उपस्थित होत आहे.

काल रात्री १२ वाजता शहराबाहेर असलेल्या सोलापूर-मलकापूर मार्गावर मलकापूर पोलिस पेट्रोलिंग करत होते. दरम्यान गाड्यांची तपासणी करत असताना पोलिसांना अॅल्टो कारमध्ये पैशाची हेराफेरी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी तपासणी करताना गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींना कागदपत्रांची विचारणा केली. मात्र त्यांनी त्यावेळी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनंतर अधिक तपास केला असता, गाडीमध्ये पैसे आढळले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना पैशाबाबत विचारले असता, हि रोकड पॅनकार्ड क्लब कंपनीची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही रक्कम अमरावती, वर्धा, अकोला या शहरातून भुसावळला नेत असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र त्यांच्याजवळ या रोकडीविषयी कोणतेही विवरण नसल्याने, पोलिसांचा संशय बळावला आहे.

Leave a Comment