देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी

mukesh-ambani
नवी दिल्ली – देशातील पहिल्या दहा लक्ष्मीवंतांच्या यादीत स्थान मिळवून अदानी उद्योगसमुहाचे कार्याध्यक्ष गौतम अदानी यांनी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला असून तब्बल १५२ टक्क्यांनी त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याची माहिती आहे. तर रिलायन्स उद्योगसमुहाचे कार्याध्यक्ष मुकेश अंबानीच देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान असून त्यांच्या संपत्तीत ३७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

चीनमधील एका संस्थेच्या अहवालात गौतम अदानींच्या संपत्तीत १५२ टक्क्यांची वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले असून त्यांची एकूण संपत्ती ४४ हजार कोटी रुपये आहे. त्यांच्याशिवाय, या दहा धनवंतांच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल स्थानावर असून त्यांची संपत्ती १. ६५ लाख कोटी रुपये आहे. सन फार्मा कंपनीचे प्रमुख दिलीप संघवी दुसर्‍या स्थानावर असून, त्यांची संपत्ती १.२९ लाख कोटी रुपये आहे. तर लक्ष्मी मित्तल तिसर्‍या स्थानावर असून त्यांची संपत्ती ९७ हजार कोटी रुपये आहे.

दरम्यान, भारतातील अब्जाधीशांची संख्या गेल्या वर्षभरात ५९ वरून १०९ वर पोहोचली आहे. त्यापैकी सर्वाधिक ७० जण मुंबईतील आहेत.

Leave a Comment