ठाणे पोलिसांची प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ योजना

rikshaw
ठाणे – ठाणे : आता ठाणे शहरात रिक्षाने प्रवास करतांना महिलांना मनात भीतीला जागा देण्याची गरज नाही, कारण आता स्मार्ट ओळखपत्र उपक्रम ठाण्यात सुरू करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी रिक्षातून पडून गंभीर जायबंदी झाली. स्वप्नाली लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला विशेष महत्त्व दिले जात आहे.

ठाण्यातील प्रवाशांच्या सुरक्षेच्या धर्तीवर ठाणे पोलिस आयुक्त विजय कांबळे यांनी गुरुवारी ‘स्मार्ट सेफ स्टिकर्स’ या नव्या योजनेची घोषणा केली. या ओळखपत्रामध्ये वाहन नोंदणी क्रमांक, वाहन मालकाचे नाव, पत्ता, फोटो अशी संपूर्ण माहिती दिलेली असून हे ओळखपत्र वाहनचालकाच्या सीटच्या मागे लावण्यात येईल. तसेच ओळखपत्रावर क्यू आर कोडही दिलेला आहे. या ओळखपत्राचा फोटो काढल्यानंतर ही सर्व माहिती तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केली जाईल अशी माहिती कांबळे यांनी दिली.

ऑटोरिक्षा संघटनेकडूनही या योजनेचे स्वागत करण्यात आले असून ही योजना अधिकाधिक राबवण्यासाठी संघटनेकडून सहकार्य केले जाणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु केली जाणार असून यामध्ये सुमारे पाच हजार रिक्षांचा समावेश केला जाणार आहे. त्यानंतर इतर भागांमध्येही योजना विस्तारित केली जाईल.

काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकाचा संशय आल्याने ठाण्यातील स्वप्नाली ला़ड या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली होती. या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच धर्तीवर ही नवी योजना सुरु करण्यात आली आहे.

Leave a Comment