गॅलेक्सी कोर २ झाला ३,९०० रुपयांनी स्वस्त

samsung
नवी दिल्ली – सॅमसंगने दोन महिन्यांपूर्वीच लाँच झालेल्या ‘गॅलेक्सी कोर २’ या बजेट फोनची किंमत ३,९०० रुपयांनी कमी केली आहे.

सॅमसंगने आपल्या ‘गॅलेक्सी कोर २’ या फोनची किंमत गुगलने लाँच केलेल्या ‘अॅड्रॉईड वन’ तसेच शिओमी आणि आसुस या फोन्सला टक्कर देण्यासाठी कमी केली आहे.

सॅमसंगने ‘गॅलेक्सी कोर २’ हा फोन जुलैमध्ये ११ हजार ९०० रुपयांना लाँच केला होता. हा फोन आता ३,९०० रुपयांनी स्वस्त झाला असून, याची किंमत आता ८ हजार रुपये इतकी झाली आहे.

बेस्ट फिचर्स असलेल्या गूगलच्या अॅड्रॉईड वन या फोनची किंमत अवघी ६ हजार ५०० रुपये इतकी आहे. तर, शिओमी आणि आसुसच्या किंमतीही बजेटमध्ये आहेत. यामुळे सॅमसंगने ‘गॅलेक्सी कोर २’ च्या किंमतीत घट केली आहे.

Leave a Comment