वय पाच वर्षे, उंची ५ फूट ७ इंच

karan
मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात राहणारे सिंग कुटुंब मुळातच उंच. त्यांची ही परंपरा त्यांचा छोटा मुलगा करण यानेही कायम राखताना असामान्य उंचीबद्दल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नांव कोरले आहे.

संजय आणि श्वेतलना या जोडप्याचा मुलगा करण पाच वर्षाचा आहे मात्र त्यांची उंची आहे ५ फूट ७ इंच. श्वेतलाना यांची उंचीही ७ फूट २ इंच असून त्यांच्याही नावाची नोंद गिनीज रेकॉर्ड मध्ये दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर सिद्दीका परवीन या प.बंगालमधील मुलीने हे रेकॉर्ड तोडले. तिची उंची आहे ८ फूट २ इंच.

करणचे वडील संजय डायटिशियन आहेत. त्यांचीही उंची ६ फूट ६ इंच आहे. श्वेतलाना आणि संजय यांचा २००७ साली प्रेमविवाह झाला आहे.

Leave a Comment