मुंबई – पॅनासॉनिक या कंपनीने आपला ‘ल्यूमिक्स डीएमसी-सीएम १’ नवा कॅमेरा-स्मार्टफोन लाँच केला असून जर्मनीत या फोनचे दमदार लाँचींग झाले.
पॅनासॉनिकने आणला कॅमेरा-स्मार्टफोन
एकाच फोनमध्ये झक्कास कॅमेरा आणि अद्यायवत स्मार्टफोन ही दोन्ही वैशिष्ट्ये उपलब्ध असून अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम आधारीत असलेल्या या फोनमध्ये लेईका लेन्स आणि १ इन सेन्सर लावण्यात आले आहे. २० मेगापिक्सेलचा सेन्सर फक्त पॅनासॉनिकच्या कॅमेऱ्यातच उपलब्ध असतो.
२.५ सेंटिमीटरच्या या सेन्सरमुळे कमी प्रकाशातही फोटो काढण्यास तसेच अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) व्हिडीओ बनवायलाही मदत होते. या फेनला लेन्स, अॅपेचर आणि शटर सेटिंग नियंत्रित करण्यासाठी धातूचे आवरण लावण्यात आले आहे.
वर्षअखेरीस ‘ल्यूमिक्स डीएमसी-सीएम १’ हा फोन जर्मनी आणि फ्रान्सच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याची किंमत सुमारे ९०० युरो असेल, असा अंदाज आहे.
सॅमसंग झूमला टक्कर देण्यासाठी पॅनासॉनिकने हा फोने बाजारात उतरवला आहे.