हत्याप्रकरणी शरीफ यांच्याविरोधात गुन्हा

nawaz-sharif
इस्लामाबाद – सरकारविरोधी आंदोलन करणा-या आंदोलकांची हत्या केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, मंत्रिमंडळातील मंत्री आणि उच्चस्तरीय अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरीफ आणि मंत्र्यांविरोधात हत्येप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पाकिस्तान दंड विधानानुसार कलम ३०२ (पूर्वनियोजित हत्या) आणि दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तान आवामी तेहरीकचे नेते ताहिरुल काद्री यांनी ही तक्रार दाखल केली.

३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानासमोर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते.

Leave a Comment