मुंबईत रंगणार सहाव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार

body-building
मुंबई – ७ ते ९ डिसेंबर २०१४ दरम्यान मुंबईत सहाव्या जागतिक शरीरसौष्ठव (मिस्टर वर्ल्ड) आणि फिजिकल स्पोर्ट्स स्पर्धेचा थरार रंगणार आहे. जगभरातील ४००हून अधिक शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत नशीब अजमावतील. स्पर्धेत प्रथमच भारतातील महिला शरीरसौष्ठवपटू सहभागी होतील.

मुंबईत स्पर्धेची घोषणा जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे (डब्लूबीपीएफ) आणि इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे (आयबीबीएफ) अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा मधोक, आयबीबीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे आणि आयोजन समितीचे अध्यक्ष मधुकर तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. ‘मि. वर्ल्ड’ स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना एकूण ३५ गटांमध्ये विभागण्यात आले आहे. हे सर्व जण मुख्य स्पर्धेसह सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटू, आदर्श शरीरयष्टी, अ‍ॅथलेटिक शरीरयष्टी आणि क्रीडा शरीरयष्टी अशा किताबांसाठी भिडतील.

गोरेगाव (पूर्व) येथील बाँबे एग्झिबिशन सेंटरमध्ये होणा-या जागतिक स्पर्धेत हंगेरी, इराण, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आदी ६० देशांतील ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी होतील. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, रेल्वे, नौदल आणि सर्व्हिसेसचे प्रतिभावंत शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

Leave a Comment