बगदादजवळ अमेरिकन लढाऊ विमानांचे हल्ले सुरू

us
वॉशिग्टन – अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इस्लामिक स्टेटने काबीज केलेल्या इराकची राजधानी बगदाद येथून जवळच असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले सुरू केले आहेत. इराक सिरीयातील इस्लामिक स्टेटच्या ताब्यातील प्रदेशावर अमेरिका गेले अनेक दिवस हवाई हल्ले करत आहे मात्र बगदादच्या जवळ हल्ले सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अमेरिकन नागरिकांच्या आणि अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी तसेच इराकच्या सैन्याला मदत म्हणून अमेरिका इस्लामिक स्टेटवरचे हवाई हल्ले सुरू ठेवेल आणि गरज पडली तर हल्यांची व्याप्ती वाढवेल असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर हे हल्ले सुरू करण्यात आले आहेत. सोमवारपासून नव्याने सुरू झालेल्या या हल्ल्यांत १ हल्ला बगदादजवळ तर दुसरा माऊंट सिंजर वर केला गेला. या हल्ल्यात इस्लामिक स्टेटच्या कांही लढाऊ वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या कांही दिवसांत अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याची संख्या १६२ वर गेली आहे.

Leave a Comment