भारत आणि वेस्टइंडिज मालिकेचे वेळापत्रक जाहीर

cricket
मुंबई : वेस्ट इंडिज क्रिकेट टीम येत्या ऑक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत असून या दरम्यान टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये पाच एकदिवसीय, तीन कसोटी आणि एकमेव टी-२० सामना खेळला जाणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले.

मुंबईमध्ये सराव सामन्यापासून दौऱ्याची सुरुवात होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना कोच्चीमध्ये ८ ऑक्टोबरला होणार असून दुसरा एकदिवसीय सामना नवी दिल्लीत ११ ऑक्टोबरला होणार आहे.

एकमेव टी-२० सामना कटकमध्ये २२ ऑक्टोबरला खेळविण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबरला हैदराबादमध्ये पहिलाकसोटी सामना खेळण्यात येणार आहे.

सराव सामना
मुंबई : ३ ऑक्टोबर व ५ ऑक्टोबर

एकदिवसीय सामन्याचे वेळापत्रक
९ ऑक्टोबर – पहिला एकदिवसीय सामना – कोच्ची
१२ ऑक्टोबर – दुसरा एकदिवसीय सामना – दिल्ली
१४ ऑक्टोबर – तिसरा एकदिवसीय सामना – विशाखापट्टणम
१८ ऑक्टोबर – चौथा एकदिवसीय सामना – धर्मशाळा
२० ऑक्टोबर – पाचवा एकदिवसीय सामना – कोलकाता

२२ ऑक्टोबर – टी-२० सामना – कटक

२५ ते २७ ऑक्टोबर – सराव सामना – कानपूर

कसोटी मालिकेचे वेळापत्रक
३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पहिली कसोटी (हैदराबाद)
७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर दुसरी कसोटी (बंगळुरू)
१५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर तिसरी कसोटी (अहमदाबाद)

Leave a Comment