सरकारने हटवावे डिझेलच्या किंमतीवरील नियंत्रण – रघुराम राजन

raghuram-rajan
नवी दिल्ली – रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी डिझेलची किंमत कमी करणे किंवा वाढवणे याबाबत केंद्र सरकारचे असलेले नियंत्रण आता हटवावे असे मत व्यक्त केले आहे. हा निर्णय आता आंतराराष्ट्रीय बाजारावर सोपवावे असेही राजन म्हणतात.

सरकारने आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने आता तेल कंपन्यांवरील निंयत्रण संपवावे असे सांगून राजन यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याने सरकारने आता डिझेलवरील निंयत्रण उठवावे. असे म्हटले आहे.

सध्या डिझेलच्या किंमतीचा निर्णय केंद्र सरकार घेते, मात्र पेट्रोलच्या किंमती तेल कंपन्याच ठरवतात. आज तेल कंपन्यांची बैठक होणार असुन त्यात पेट्रोल १ रूपये तर डिझेल ५० पैशांनी स्वस्त करण्याचा निर्णय होऊ शकतो. डिझेलचे दर सात वर्षांनंतर पहिल्यांदाच कमी होणार आहेत.

Leave a Comment