पुण्यात चीनची ५ अब्ज डॉलर्स गुंतवणूक

china
पुणे – ऑटोमोबाईल हब ही पुण्याची ओळख आता जगपातळीवर होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याला कारणीभूत ठरली आहे चीनची या क्षेत्रातील प्रचंड गुंतवणूक. चीन पुण्यात ऑटोमोबाईल औद्योगिक पार्कसाठी ५ अब्ज डॉलर्स म्हणजे ३०३२३ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. १७ सप्टेंबरला अहमदाबाद येथे होत असलेल्या पंतप्रधान मोदी आणि चीन अध्यक्ष शी जिंगपिंग यांच्या भेटीत या संदर्भातली घोषणा केली जाईल असे समजते.

चीनचे मुंबईतील वाणिज्य दूत लियू युफा या संदर्भात म्हणाले की चीन चार औद्योगिक पार्क भारतात उभारणार आहे. त्यात पुण्यात ५ चौ.किलोमीटर जागेत आर्टोमोबाईल पार्क उभारले जाणार आहे. यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. अन्य पार्कमध्ये वीज पार्कसाठी गुजराथ, वस्त्रोद्योगासाठी तमीळनाडूची निवड करण्यात आली आहे. चीनने रेल्वे आधुनिकीकरण, हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेनसाठी ५० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची तयारी केली असून रेल्वे मार्ग देखरेख व विकासासाठी रेल्वे कॉरिडॉर चीनकडे सोपविण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या पाच वर्षात चीन औद्योगिक पार्क प्रकल्पात १०० अब्ज डॉलर्स म्हणजे ६ लाख कोटी रूपये गुंतविणार आहे.

Leave a Comment