टू व्हिलरच्या किमतीचे मेमरी कार्ड!

scandisk

मुंबई : आजपर्यंतचे सर्वात मोठे मेमरी स्टोरेज कार्ड मेमरी कार्ड बनवणाऱी कंपनी सॅनडिस्कने बनवले असून सॅनडिस्कने तब्बल ५१२ जीबी मेमरी कार्ड लाँच केले आहे. पण याची किंमत ८०० डॉलर म्हणजेच सुमारे ५० हजार रुपये आहे व ह्या एसडी कार्डचा आकार पोस्टाच्या तिकीटाच्या आकाराएवढे आहे.

आपले पहिले एसडी कार्ड ५१२ MB क्षमतेचे सॅनडिस्कने बनवले होते. आता त्यांनी तब्बल ५१२ GB पर्यंत स्टोरेज वाढवले असल्यामुळे पहिल्या मेमरी कार्डच्या तुलनेत हे कार्ड तब्बल एक हजार पट जास्त आहे.

फिल्ममेकर्स आणि एचडी ४ के वापरणाऱ्यांसाठी इतक्या मोठ्या स्टोरेज क्षमतेचे हे मेमरी कार्ड बनवण्यात आले आहे. एचडीपेक्षाही चारपट उत्तम ४-के फॉर्म्याटसाठी मोठ्या फाईल स्टोरेजची आवश्यकता असते. साधारणत: एक मिनीटाची ४-के शुटिंग फाईल ५ जीबी जागा घेते असल्यामुळे असे मोठ्या स्टोरेज क्षमतेचे मेमरी कार्ड बनवल्याचे सॅनडिस्कने म्हटले आहे. त्यामुळे आता मोबाईल, डिजीटल कॅमेरा, कॅमकॉर्ड्समध्ये आता इतक्या मोठ्या क्षमतेचे मेमरी कार्ड दिसू शकतील.

Leave a Comment