शनिवारी म्हणजे आज कोणत्याही वेळी सूर्यावर उठलेल्या वादळाच्या चुंबकीय लहरी पृथ्वीच्या वातावरणात येण्याची शक्यता नासातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. या लहरींचा मानवी जीवनावर कोणताही विपरित परिणाम होणार नसला तरी या काळात वायफाय, स्मार्टफोन डिस्कनेक्ट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे. गेल्या कांही दिवसांत दोन वेळा सूर्यवादळातून उठलेल्या लहरी पृथ्वीच्या दिशेने आल्या मात्र पृथ्वीवरील वातावरणावर आदळल्या नव्हत्या. याता मात्र त्या पृथ्वीच्या वातावरणात शिरण्याची दाट शक्यता आहे व त्यामुळे वीज पुरवठा, मोबाईल नेटवर्क, एटीएम, फ्लाईटचे रेडिओ दळणवळण , सॅटेलाईट सिस्टीम, जीपीएस वर त्याचा विपरित परिणाम होऊ शकणार आहे.
सोलर वादळ येतेय – फोन नेटवर्क ठप्प होण्याचा इशारा
सूर्यावर अशी वादळे नेहमीच होत असतात मात्र दर ११ वर्षांनी या वादळाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचत असते. याला सोलर सायकल असेही म्हणले जाते. सूर्य हा वायूचा तप्त गोळा आहे. त्यावर उठलेल्या वादळांमुळे ज्या चुंबकीय हालचाली होतात त्यातून चुंबक भारीत पार्टीकल्स बाहेर पडतात. हे पार्टीकल पृथ्वीच्या वातावरणात घुसले की येथील चुंबकीय क्षेत्रात बदल होतात व त्याचा परिणाम चुंबकीय क्षेत्रावर आधारित असलेल्या सर्व सेवांवर होतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
यापूर्वीचे सर्वात मोठे सौर वादळ १८५९साली झाले होते व त्याच्या परिणामाने पृथ्वीवर टेलिग्राफ तार शॉर्ट होण्यात व कांही ठिकाणी घरांना आगी लागण्यात झाला होता.