लेपाक्षी मंदिर – तरंगत्या खांबावरचे अद्भूत लेणे

mandir
आंध्रप्रदेशातील अनंतपूर जवळ असलेले लेपाक्षी मंदिर हा शिल्पकलेचा अत्यंत सुंदर नमुना आहेच पण या मंदिरात असलेले तरंगते दगही महाप्रंचड खांब हे पर्यटक तसेच भाविकांसाठी खास आकर्षण आहेत. तसेच अखंड ग्रॅनाईट खडकातून कोरलेला महाप्रचंड नंदी आणि नागलिंग प्रतिमा व पायाचे ठसे एकदा तरी पहायला हवे असेच.

विजयनगर साम्राज्य काळातील म्हणजे १६ व्या शतकातील हे मंदिर शिव, विष्णू आणि वीरभद्र यांना अर्पण केलेले आहे. या तिन्ही देवांची येथे वेगवेगळी मंदिरे आहेत. लेपाक्षी मंदिराचा डोलारा सांभाळणार्‍या दगडी प्रचंड खांबातील ७० खांब जमिनीवर टेकलेले नाहीत. म्हणजेच ते तरंगते आहेत. या खांबाखालून पातळ कपडा आरपार जातो. येथे येणारे भाविक हा प्रयोग आवर्जून करतातही कारण असे कापड दगडी खांबाखालून आरपार केले की घरात सुख समृद्धी येते असा भाविकांचा विश्वास आहे.
mandir2
विरण्णा आणि वीरपण्णा या दोघा भावांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगर वास्तकलेचा अतिशय उत्तम नमुना असलेल्या या मंदिरांत दगडी साखळी, तरंगते खांब, दुर्गापडम, लेपाक्षीच्या साडीचे कोरलेले डिझाईन अशा कोरीवकामाबरोबरच अतिशय सुंदर म्युरल पेंटिग्जही आहेत. भिंतीवर महाभारत रामायणातील कथा आहेत तर छतावर पेंटींग्ज आहेत. या मंदिरातील प्रचंड नंदी हे खास आकर्षण आहे. साडेचार मीटर उंच, आठ मीटरपेक्षा अधिक रूंद असा हा नंदी अखंड खडकातून कोरला गेला आहे.

अशी कथा सांगितली जाते की या मंदिराचे बांधकाम करणार्‍या बिल्डरशी विरण्णाचे कांही मतभेद झाले व त्याने बिल्डरचे डोळे काढण्याची आज्ञा केली. ते ऐकताच बिल्डरने स्वतःच आपले डोळे काढून भिंतीवर फेकले. त्या डोळ्यातील रक्ताच्या खुणा अजूनही भिंतीवर आहेत. विरूपाक्षाचे डोळे म्हणून ते पाहिले जातात. बंगलोर पासून या गावी बस, रेल्वेनेही जाता येते.

Leave a Comment