
पिंपरी-चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणुक आज बिनविरोध झाली. राष्ट्रवादीने यात अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड महापालिकेवर निर्विवाद सत्ता
राष्ट्रवादी काँग्रेसची या महापालिकेवर निर्विवाद सत्ता असल्याने, याही वेळेस महापौर, उपमहापौरपदी राष्ट्रवादीचेच नगरसेवक विराजमान होणार हे निश्चीत होते. त्यानुसार महापौरपदी शकुंतला धराडे आणि उपमहापौरपदी प्रभाकर वाघेरे यांच्या निवड झाली आहे.
हे दोघेही आज निवडणुकीच्या औपचारीकतेनंतर आप-आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहेत. विशेष म्हणजे या वेळेस महापौर पद हे पहिल्यांदाच अनुसुचित जमातीसाठी राखीव झाले होते. या प्रवर्गातून महापौरपदी विराजमान होण्याचा पहिलाच बहुमान धराडे याना मिळाला आहे.
