गुगलच्या ५० लाख युजरचे नेम्स व पासवर्ड हॅक

googe
अॅपलच्या हायप्रोफाईल आय क्लाऊड फियास्को नंतर आता गुगल सायबर क्राईमचा बळी ठरली आहे. गुगलच्या ५० लाख युजरचे नेम्स व पासवर्ड हॅक झाले असल्याचा दावा रशियन हॅकर्सनी केला असून त्यातील ६० टक्के पासवर्ड अजूनही अॅक्टीव्ह असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. टिव्हस्की या नावाने कार्यरत असलेल्या या हॅकरने बिटकॉन फोरम वर हा दावा केला आहे.

या हॅकरच्या म्हणण्यानुसार गुगल अकौंटसाठी युजर वापरत असलेले पासवर्ड गुगलच्या अन्य सेवांसाठी म्हणजे जीमेल, यूट्यूब, हँगआऊट, ड्राईव्ह, मॅपसाठी वापरले गेले आहेत. त्यामुळे ५० लाखाहून अधिक युजरचे पासवर्ड लीक झाले आहेत. गुगलने मात्र हा दावा फेटाळताना २ टक्क्यांपेक्षा कमी युजरचे युजरनेम पासवर्ड काँबिनेशन वर्कआऊट होऊ शकले असेल असा खुलासा केला आहे. गुगलच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या ऑटोमेटेड अँटी हायजॅकींग सिस्टीममुळे लॉगइनचे प्रयत्न निष्फळ ठरविले आहेत. गुगलचे त्यांच्या युजरना पूर्ण संरक्षण आहेच मात्र कांही अकौंटना नव्याने पासवर्ड सेट करण्याची गरज पडू शकते.

कंपनीने युजरना असेही आवाहन केले आहे की पासवर्ड सेट करताना गुगलसाठी युनिक आणि स्ट्राँग पासवर्ड सेट करण्याची काळजी घ्यावी तसेच रिकव्हरी ऑप्शन अपडेट करत राहावे.

Leave a Comment