कॉंग्रेसचा अजून एक बुरुज ढासळला; आमदार प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा

prashant-thakur
मुंबई: विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पनवेलचे काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

ठाकूर यांची खारघर टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांकडून टोलवसुली करु नये अशी मागणी होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले. पण दोन महिने उलटून गेल्यानंतरही कोणताच निर्णय न घेतल्याने आमदार प्रशांत ठाकूर नाराज झाल्यामुळे ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे. शिवाय यापुढे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार नसल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment