अखेर नाशिकचे महापौरपद मनसेच्या खिशात

manse
नाशिक – नाशिक महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या साथीने नाशिकचे महापौरपद कायम राखण्यात यश मिळवले आहे.

मनसेचे अशोक मुर्तडक आज सकाळी राजीव गांधी भवन येथे पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झाले. मनसेच्या अशोक मुर्तडक यांना ७५ मते मिळाली तर, महायुतीच्या सुधाकर बडगुजर यांना ४४ मते मिळाली.

मनसेला नाशिक महापालिकेत बहुमत सिध्द करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. मनसेक़डे स्वत:चे ३७ नगरसेवक होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन, मनसेने सहज बहुमताचा आकडा गाठला.

उपमहापौरपदी आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक गुरमित बग्गा यांची निवड झाली. मनसेने महापौरपदावरील भाजपाचा दावा नाकारल्यानंतर भाजपने अडीचवर्षांपासून असलेली युती तोडत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment