मोदींच्या स्वागतसमारंभाचे होस्ट मिस अमेरिका आणि न्यूज अँकर

america
न्यूयॉर्क- येत्या २८ सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका भेटीवर जात असून त्यांच्यासाठी इंडियन अमेरिकन कम्युनिटीने न्यूयोर्कच्या मेडिसन स्क्वेअरमध्ये आयोजित केलेल्या स्वागत समारंभाचे होस्ट म्हणून मिस अमेरिका नीना दावुलरी आणि पीबीएस न्यूजचे प्रसिद्ध अँकर हरि श्रीनिवासन यांची निवड केली गेली आहे. विदेशी देशप्रमुखाचा आत्तापर्यतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा स्वागत समारंभ आहे.

इंडियन अमेरिकन कम्युनिटीचे प्रवक्ते आनंद शहा म्हणाले की अमेरिका ही सर्वात बलाढ्य लोकशाही आहे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या नेत्याचे भाषण ऐकण्यास सर्वजण उत्सुक आहेत. या ठिकाणी २० हजार लोकांचीच बसण्याची व्यवस्था होऊ शकणार आहे. कार्यक्रमासाठी हजारोंनी अर्ज भरले असले तरी लॉटरी पद्धतीने निवड करून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला भारताचा १५०० वर्षांचा इतिहास सांगितला जाणार आहे. त्यात स्वामी विवेकानंदाच्या शिकागो येथील भाषणापासून ते मोदींच्या सत्ताग्रहणापर्यंतचा कालावधी असेल. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मागितली गेली आहे. मोदी ४५ ते १ तास भाषण करतील व त्यापूर्वी मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जाणार आहेत.

Leave a Comment