चॉपस्टीक जोखणार खाद्यपदार्थाची गुणवत्ता

chopstick
चीनमध्ये आजकाल तेलात भेसळ हा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यावर चीनी कंपनी बाएडूने इलेक्ट्रोनिक चॉपस्टीकचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या चॉपस्टिक खाद्यपदार्थात बुडविल्या की त्या पदार्थासाठी वापरले गेलेले तेल कसे आहे, पदार्थात मीठ किती आहे तसेच पदार्थाची पौष्टिक मूल्ये कोणती आहेत याची माहिती मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे दिसायला या चॉपस्टीक नेहमीच्या चॉपस्टीकसारख्याच आहेत. स्मार्ट चॉपस्टीक व्हिडीओवर पदार्थाच्या गुणवत्तेसंबंधी माहिती देणार आहेत.या चॉपस्टीक संगणकाच्या सहाय्याने वायफाय व ब्ल्यू टूथशी कनेक्ट करता येतात.

याचबरोबर या कंपनीने गुगल ग्लास प्रमाणेच बाएडू हेडसेटही तयार केले आहेत. मात्र त्याला गुगल ग्लास सारखा स्क्रीन नाही. या हेडसेटला कॅमेरा आहे आणि हेडसेटला जोडलेले इअरपीस व माईकच्या सहाय्याने युजरशी गप्पा करता येतात. ही दोन्ही उपकरणे अजून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली नाहीत मात्र ती लवकरच येतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment