चक्क… सहा कोटी रुपयांचा आयफोन

iphone
मुंबई : स्मार्टफोन आजच्या काळात गरजेची वस्तू झाला असून आजकाल प्रत्येकाच्या हातात सहज पाहायला मिळतो. कारण आजकाल स्मार्टफोन काही हजार रुपयांना मिळतो. पण याच फोनची किंमत जर कोटी रुपयांमध्ये असेल तर, थोडे चक्रावले असाल ना! पण इंग्लंडच्या एका व्यक्तीने असाच महागडा म्हणजे तब्बल सहा कोटी रुपयांचा स्मार्टफोन बनवला आहे. हा फोन आयफोन ५ ब्लॅक डायमंड आहे. याचा आणि अॅपल कंपनीचा काही संबंध नाही.

वर्ल्ड फेमस गॅजेट डिझायनर स्टुअर्ट ह्यूजने हा फोन आपल्या काही खास कस्टमर्ससाठी बनविला असून स्टुअर्टने या फोनच्या डिझाइनसाठी दुर्लभ आणि अत्यंत किमती हिऱ्यांचा वापर केला आहे. हा फोन पूर्णपणे हँडमेड आहे. हा फोन बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर करण्यात आलेला नाही.

त्याला अशा प्रकारचा एक फोन बनविण्यासाठी आणि सजविण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी लागतो. स्टुअर्टला हा फोन बनविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ह्युज प्रथम आयफोनला पूर्णपणे उघडतो आणि त्याला ब्लॅक डायमंडने सजवतो.

तो लक्झरीला टेक्नॉलॉजीशी जोडण्यात विश्वास ठेवतात. गेल्या काही दिवसापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा एक मोबाईल फोन बनविला आहे. हा फोन खूप प्रसिद्ध झाला होता. ह्यूज म्हटले, फोनची किंमत इतकी असली तरी त्याची खरेदी करणाऱ्यांची कमतरता नाही.

Leave a Comment